Thursday, November 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याम्हापण-पाट बाजारपेठत २९ सप्टेंबर पासून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम...

म्हापण-पाट बाजारपेठत २९ सप्टेंबर पासून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम…

नवरात्रोत्सवानिमित्त उत्साही मित्रमंडळाचे आयोजन…

वेंगुर्ले .ता. २७:तालुक्यतील उत्साही मित्रमंडळ म्हापण यांच्या वतीने म्हापण-पाट बाजारपेठ पिंपळपार येथे नावरात्रोत्सवा निमित्त रविवार २९ सप्टेंबर ते बुधवार ९ ऑक्टोंवर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी सकाळी देवीचे आगमन, पूजन व संध्याकाळी भजने, ३० रोजी रात्रौ ९ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचे नाटक, १ ऑक्टोंबर रोजी रात्रौ ९ वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा, २ ऑक्टोंबर रोजी साय. ७.३० वाजता खुल्या दांडिया स्पर्धा, ३ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता ओम शांतादुर्गा रामेश्वर कला ग्रुप म्हापण यांचा कोकणची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी यांचा आकर्षक व्हरायटी शो, ५ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता चेंदवणकर नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक, ६ ऑक्टोंबर रोजी सायं. ७ वाजता डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. यामध्ये कडावल येथील सचिन सावंत बुवा व देवगड-नाडण येथील राजेंद्र मुंडे बुवा यांच्यात सामना रंगणार आहे.
७ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता रामेश्वर प्रोडक्शन मुंबई निर्मित “गाव तसो चांगलो’ हे नाटक सादर होणार आहे. तर ८ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता कोल्हापूर येथील ऑर्केष्टा झंकार सादर होणार आहे. आणि ९ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढून देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्साही मित्रमंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments