दहा दिवस रंगणार विविध स्पर्धा : महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन…
मालवण, ता. २७ : नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने सातव्या वर्षी धुरीवाडा येथील यतीन खोत यांच्या निवासस्थानालगत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘गरबा उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
२९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता उदघाटन समारंभ होईल. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता ८ ऑक्टोबर रोजी रात्री होणार आहे.
सौ. शिल्पा खोत यांच्या पुढाकारातुन स्वराज्य महिला ढोल पथकाच्या विशेष सहकार्यातून नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्यावतीने गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. कपल (पती-पत्नी) डान्सचे आयोजन करण्यात येणार आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फनी गेम अशा स्पर्धाही विविध गटात होणार आहेत. समाजात विशेष योगदान देणाऱ्या ९ महिलांचा सन्मानही यात केला जाणार आहे.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दहा दिवस रंगणाऱ्या या उत्सवात सहभागी व्हा असे आवाहन यतीन खोत, शिल्पा खोत मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.