सावंतवाडी ता.३१: दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चितारआळी बॉईज संघ ठरला.तर कलेश्वर मित्र मंडळ नेरुर द्वितीय व हनुमान बालगोपाल मित्र मंडळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला.सावंतवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मोती तलावकाठी ही स्पर्धा पार पडली. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.एकापेक्षा एक सरस अशा नरकासुर प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या. महिला संरक्षण, बलात्काऱ्यांना फाशी, पर्यावरण रक्षण आदी सामाजिक संदेश देखील या निमित्ताने देण्यात आले. शिवतेज मित्रमंडळाकडून ही स्पर्धा आयोजित केली होती. यंदा या स्पर्धेचे ६ वे वर्ष होते. या स्पर्धेत सावंतवाडीतील चितारआळी बॉईजचा नरकासुर प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला. द्वितीय कलेश्वर मित्रमंडळ नेरूर तर तृतीय क्रमांक हनुमान बालगोपाळ मित्रमंडळ माठेवाडा यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे मालवणी एक्स्प्रेस दळवीवाडा माजगाव व आत्मेश्वर युवक मित्रमंडळ माठेवाडा यांना देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली.
याप्रसंगी दिलीप भालेकर, दत्ताराम सावंत, यशवंत देसाई, भाई शिर्के, मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत, बाळकृष्ण सावंत, संजय कोरगावकर, प्रितेश आईर, शुभम गावडे, प्रज्ञेश गावडे, राकेश कोचरेकर, महेश डोंगरे, गौरव केसरकर, महेश चितारी आदी उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने सावंतवाडीकरांनी नरकासुराच्या महाकाय प्रतिमा पहाण्यासाठी गर्दी केली होती.