Monday, November 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या 'स्वर संध्या"ला उत्स्फूर्त प्रतिसाद...

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या ‘स्वर संध्या”ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ,ता.३१: बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग आयोजित “स्वर संध्या” या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माणगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य अरुण मर्गज, प्राचार्य परेश धावडे, प्राचार्य चैताली बांदेकर, प्राचार्या कल्पना भंडारी तसेच महेश कुडाळकर, सुंदर गाळवणकर उभयता आदी उपस्थित होते.

‘हे जगदीश सदाशिवशंकरl भवभय हारक दुःख निवारकll’ या सुंदर भक्तीमय ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ;तर तू बुद्धी दे तू तेज दे ही प्रार्थना तनया तवटे, स्वरा सापळे, मुग्धा शिरसाट, मान्य शेठ, स्वरा नार्वेकर, प्रज्ञा आचार्य, विना केडगाळे, भार्गवी सडवेलकर व सिद्धार्थ शारबिद्रे,धरीला पंढरीचा चोर- सौम्या नाईक, मी डोलकर डोलकर दर्याचा राजा-सानवी खवणेकर, माझा शिवबा ग सिंहासनावर बसला-मनस्वी तेंडुलकर, श्रवण मेस्त्री, हिमांशू पेडणेकर ,स्वामी समर्थ माझी आई -पूजा आईर, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा(गझल)- संकेत पाटकर,आली माझ्या घरी ही दिवाळी लक्षदीप हे उजळले घरी-सानवी खवणेकर, काळ देहाशी आला धावून- संकेत पाटकर ,देवा तुझ्या नावाचं याड लागलं-शमिका सुकी, मंदिरात अंतरात- हिमांशू पेडणेकर, केशवा माधवा नारायणा- सायलीं वारंग ,मन मंदिरा तेजाने मंदार जोशी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे- मनस्वी खवणेकर, कोणास ठाऊक कसा- अन्वी माने, कश्यपी तांबे, रिया देसाई, स्वरा धुमाळ, जगण्याचे देवा- श्रवण मेस्त्री, यांनी गीते गायली.

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ व श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ यांच्या सहकार्याने व उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने, सचिन कुडतडकर यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली सिंथेसाईजर -महेश तळगावकर, हार्मोनियम साथ- अमित मेस्त्री, पखवाज- युवराज माधव, तबला साथ- रजत गाळवणकर, साईड रिदम- सचिन कुडतरकर व भार्गव चव्हाण यांनी लिलया सांभाळल्यामुळे नवीन कलाकारांची संगीत साथ असूनही एक व्यावसायिक संगीतमय कार्यक्रमातील दर्जेदारपणा जाणवून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments