गुणवंत सावंत याचे स्पष्टीकरण; त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही….
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले जांभवडे येथील चिंतामनी मडव यांचा शिंदे शिवसेनेशी काहीही संबंध नसून ते मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ग्रामपंचायत निवडणूक शिंदे शिवसेनेने फक्त पाठिंबा दिला होता.मात्र त्या निवडणुकीत चिंतामणी मडव यांच डिपॉझिटही जप्त झाले. त्या नंतर कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमात ते सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसून चिंतामणी मडव हे आमचे कार्यकर्ते नाहीत, अशी माहिती शिंदे शिवसेनेचे आंब्रड जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख गुणवंत सावंत यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.