कुडाळ पोलिसांची कारवाई; ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश…
कुडाळ,ता.३१: चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून करून पलायन केलेल्या संशयिताला कुडाळ पोलिसांनी झारखंड येथील नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली. ओमप्रकाश बंधन सिंह (वय ५२, सध्या रा. भडगाव बुद्रुक कुडाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने आपली पत्नी रेणुका उर्फ रेश्मा हिचा चारित्र्याचा संशयावरून खून केला होता. ही घटना १३ ऑक्टोबरला घडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.