उधारीरून झाली होती मारहाण ; एका संशयितासह कार ताब्यात…
कुडाळ,ता.३१: पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण आणि अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ६ संशयितांपैकी दोघांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील भीमराव वसेकर (रा.टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि सोलापूर) याला पंढरपूर येथून तर सुजल सचिन पवार (रा. तेरसे बांबर्डे )अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान वसेकर याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य चार संशयित अद्याप फरार आहेत तसेच या गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.