मालवण,ता.०१: माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री. कांदळगावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, नीलम शिंदे आदी उपस्थित होते.