दोघांकडून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा; परबांनी घेतले आशिर्वाद…
सावंतवाडी,ता.०१: दिपावलीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेले ठाकरे सेनेचे उमेदवार राजन तेली आणि भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी येथील मोती तलावाच्या काठावर फिरून युवाईशी संवाद साधला. विशेष म्हणजे दोघेही तलावाच्या काठावर एकत्र आले. यावेळी चक्क विशाल परब यांनी राजन तेली यांना नमस्कार करून मला आशीर्वाद द्या, असे सांगितले. यावरून दोघांसह त्यांच्या कार्यकर्त्या हशा पिकला. त्यावेळी आम्ही एकत्र आहोत. राजकारणात वेगवेगळे असलो तरी मैत्री वेगळी, असे सांगून तेली यांनी परबांना आलिंगन दिले.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज मोती तलावाच्या काठावर मोठी गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शविली.