गणेशप्रसाद गवसांची माहिती;पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा…
दोडामार्ग,ता.०४: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सिंधुदुर्गात येणार आहेत. शिंदे सेनेचे पदाधिकारी गणेशप्रसाद गवस यांनी आज गोवा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रचारासाठी येण्याचे मान्य केले आहे.
श्री. सावंत यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे निलेश राणे आणि कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी ते सिंधुदुर्गात येणार आहेत.