विशाल परबांचा दावा; जनतेच्या मनातील “विशाल” विजय निश्चित…
सावंतवाडी,ता.०४: कुणी कितीही ताकद लावली, दहशत माजवली आणि दबाव आणला तरी आपला विजय निश्चित आहे. त्यांचे चक्रव्यूह यापुढे जनताच भेदणार. कठीण परिस्थिती शेवटी माझा विजय होणार, असा दावा भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी केला आहे. आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी विशाल परब यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. मात्र आपल्या पुढील भूमिकेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की, कोणी किती दबाव आणला, ताकद वापरली दहशत माजवली तरी माझा विजय निश्चित आहे. जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे परिवर्तन नक्कीच होणार. जनतेच्या मनातील विशाल विजय आता निश्चितच होणार, असा दावा त्यांनी केला आहे.