रज्जाक बटवाले ;राणेंवर टीका करणाऱ्यांनी मुस्लिम समाजासाठी काय केले…?
कणकवली, ता.०४ : आमदार नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत ते देशद्रोहींच्या विरोधात बोलतात. आज पर्यंत त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे. त्यांची विजयी घोडदौड कोणी रोखू शकत नाही ते शंभर टक्के हॅटट्रिक करणार असे प्रतिपादन कणकवली अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी आज केले.
आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आज जे कोणी बोलत आहेत, त्यांनी आजवर मुस्लिम समाजाचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. आपली पोळी भाजली. मुस्लिम समाजाला पुढे आणण्यासाठी काय केले ते सांगावे. राणे कुटुंबीय मुस्लिम समाजातील अनेक लोकांना आर्थिक शैक्षणिक भरपूर प्रमाणात मदत केली आहे. तुम्ही काय केले ते सांगा असा सवाल यावेळी बटवाले यांनी केला.
बटवाले म्हणाले, या मतदार संघाचा विकास दहा वर्षांत त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे. एवढा विकास निधी एखादा मंत्री सुद्धा आणू शकत नाही. आज प्रत्येक गावात वाडी मोहल्ला येथे त्यांनी विकास केला आहे. म्हणून सर्व स्तरातील जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. राणेंविरोधात आज जे कुणी बोलत आहेत त्यांनी पहिले आपले आत्मपरीक्षण करावे. मुंबईत एसी मध्ये बसून विकास होत नाही. जमिनीवर बसून लोकांची काय समस्या आहे ती समजून घ्यायला हवे. आपल्या गावात आपली काय किंमत आहे, ते लोकांना माहिती आहे. तेव्हा जे कोणी आरोप करत आहे त्यांनी येणाऱ्या २३ तारीख ला आपले सामान बांधून पुन्हा पांच वर्षा साठी जाण्याचे तिकीट बुकिंग करून ठेवा.