बांदा.ता,२७:
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावात कोणतेही आजार न होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बांदा ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र देऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरविण्यात आले.
दरम्यान गेल्या पाच वर्षात गावात कोणतेही आजार उद्भवला नसल्यामुळे ग्रामपंचायतीचा हा सत्कार करण्यात येत आहे असे जिल्हा परिषद जिल्हा प्रशासन व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येवून या कार्डचे वितरण केले. यावेळी बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, प्रभारी सरपंच अक्रम खान, ग्रामसेवक दीपक अमृतसागर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
बांदा शहरातील सर्व नागरिक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन यांनी घेतलेल्या मेहनती व सहकार्यामुळे ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला आहे. भविष्यातही स्वच्छ व सुंदर बांदा ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू असे यावेळी बोलताना सरपंच अक्रम खान यांनी सांगितले.
बांदा ग्रामपंचायतीला सुध्दा जि.प.चे “चंदेरी” प्रमाणपत्र
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES