विकास सावंत; मात्र जिल्हा काॅग्रेसचे यापुढे नितेश राणेंना सहकार्य नाही..
सावंतवाडी ता.२८: आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही,जिल्ह्यातील तीनही जागा काँग्रेसला देण्यात याव्यात अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आघाडीकडून उमेदवारी दिल्यास आणि पक्षाने तसे आदेश दिल्रास निश्चीतच त्यांना सहकार्य करू,असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.
राणेंसोबत गेलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील अनेक कार्यकर्ते पुन्हा काॅग्रेस मध्ये येणार आहेत.नितेश राणे हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आमदार आहेत.परंतु त्यांनी यापुढे पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्यास त्यांना जिल्हा काँग्रेस कदापि सहकार्य करणार नाही.असेही त्यांनी सांगितले.ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा एकदा काँग्रेस मध्ये आल्यामुळे पक्षाला उभारी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर,माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर,जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर,बाबल्या दुभाषी,प्रेमानंद देसाई,रवींद्र म्हापसेकर,कौस्तुभ पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सावंत म्हणाले ब्रिगेडियर सुधीर सावंत हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यास त्याचा निश्चितच फायदा पक्षाला होणार आहे. येथील पक्ष संघटना बळकट होण्यासाठी प्रयत्न होणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला चांगले दिवस येतील.
सुधीर सावंत यांचा प्रवेश उद्या मुंबई येथे होणार आहे. त्यानंतर सोमवारी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. बांदा येथे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सावंत पुढे म्हणाले आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी तीनही जागा आम्ही मागितले आहे. सावंतवाडी मधून प्रांतिक सदस्य बाळा गावडे, विलास गावडे आणि माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी उमेदवारी मागितली आहे तर कुडाळ मधून काका कुडाळकर, पुष्पसेन सावंत, अरविंद मोंडकर इच्छूक आहेत कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण उपरकर व सुशील राणे हे इच्छूक आहेत त्यामुळे आता नेमकी कुणाला संधी द्यावी हा पक्षाचा निर्णय आहे याबाबत उपस्थित पत्रकारांनी भविष्यात आघाडी झाल्यास तुमची भूमिका काय असा प्रश्न सावंत यांना केला असता पक्षाने आदेश दिल्यानंतर बबन साळगावकर यांना निश्चितच सहकार्य करू मात्र आमदार नितेश राणे हे तांत्रिक दृष्ट्या काँग्रेस आमदार असले तरी भविष्यात त्यांनी मागणी केल्यास आम्ही जिल्हा काँग्रेस म्हणून त्यांना सहकार्य करणार नाही