व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा

2

वैभववाडी.ता,२८: व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी स्वयंसेवकांना थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिदवाक्य नाॕट मी बट यू याप्रमाणे प्रथम समाजाचा विचार केल्यानंतरच आपला स्वयंविकास साधता येईल.असे प्रतिपादन आनंदीबाई रावराणे महाविदयालयाचे उपप्राचार्य डाॕ.ब.डी.इंगवले यांनी केले.
आनंदीबाई रावराणे महाविदयालयात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५०.व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे उद्दघाटन इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रा.व्ही.सी.काकडे, प्रा.आर.बी.पाटील, पाटील डी,एस.कोरगांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले, व्यक्तीमत्व विकासाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कशी सांगता येईल.यावर पूरकाश टाकला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कशी सांगड घालता येईल यावर प्रकाश टाकला.श्रमदान, समाजपयोगी जाणीव जागृती , रॕली, कला, कौशल्य, संस्कार यांच्या मदतीने व्यक्तीमत्व विकास घडविता येतो.

10

4