Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा,ता.०५: श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज वारकरी प्रतिष्ठान, नादोडा बारदेश गोवा यांच्या गोवा ते पंढरपूर कार्तिकी एकादशी पायी वारीचे बांदा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये मठात स्वागत करण्यात आले. सायंकाळी उशीरा नामाचा गजर करत पालखीसह वारकरी मंडळींचे बांद्यात आगमन झाले. मठातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर अल्पपहार होऊन मठामध्ये त्यांचा हरिपाठाचा कार्यक्रम झाला. भाविक आणि सेवेकरी मंडळींनी दर्शनाचा लाभ घेतला. बांदा येथे जय संतोषी माता मंगल कार्यालय येथे वस्ती करून वारी पुढे मार्गस्थ झाली.
Download WordPress Themes Nulled and plugins.