अजित पवार: आमच्या घरात कोणताही गृहकलह नाही,नाहक चर्चा नको
मुंबई त.२८: माझ्यामुळे शरद पवार यांच्या नावाची बदनामी झाली.त्यामुळे व्यथित होऊन मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला.असा खुलासा माजी मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रकारची कारवाई का?असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार जेव्हा ईडीच्या चौकशीसाठी गेले त्यावेळी मी बारामतीत आलेल्या पुराच्या ठिकाणी पाहणी दौऱ्यासाठी गेलो होतो. तेथील नुकसानग्रस्तांना मदत देणे गरजेचे होते.मात्र काहीनी त्याचा वेगळा अर्थ लावला अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री.पवार यांना पत्रकार परिषद बोलताना अश्रू अनावर झाले.आमच्या कुटुंबातून जे सोडून अन्य पक्षात गेले त्याचे मला दुःख आहे.त्यांच्यावर मला कधीही टीका करावीशी वाटली नाही.मी त्यांच्यावर टीका सहन करणार नाही.त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आम्ही का कमी पडलो याचे आत्मचिंतन आम्ही करीत आहोत.शिखर बॅकेत पंचवीस हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.१०९८ कोटी अनियमितता आहे.असा रिपोर्ट आहे त्यामुळे केवळ पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. त्या ७७ संचालकात अजित पवार यांचे नाव नसते तर ती केस सुद्धा उभी राहिली नसती.