उपक्रमाचे थाटात उद्घाटन; २ ते ९ वर्षाच्या मुलांसाठी मनोरंजनाची संधी…
सावंतवाडी,ता.०७: गेली अनेक वर्षे सावंतवाडीतील चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देणार्या “वाव किड्स” रायन प्री स्कुलच्या माध्यमातून सावंतवाडी सालईवाडा येथे “प्ले झोन” सुरू करण्यात आला आहे. गोव्यातील बबलगम च्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम या ठिकाणी २ ते ९ वर्षाच्या मुलांना खेळण्या बागडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या “प्ले झोनचे” उद्घाटन भारत गॅस एजन्सीच्या प्रमुख सौ. रुचा पाटणकर, रामप्रसाद पाटणकर, स्टेपिंग स्टोन स्कुलचे संचालक रुजूल पाटणकर, सौ. कश्मिरा पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या प्ले झोन मध्ये बॉल पिट, ट्रॅम्पोलिन, झिप लाईन, स्लाईड्स, जंगल जिम, सॅण्ड पिट तसेच प्रिंटेड अँड प्ले ‘ या संकल्पनेला अनुसरून ‘डॉक्टर’, ‘ब्युटी सलाॅन’, ‘कंस्ट्रक्शन साईट’, लहान मुलांच्या ‘ ‘फाईन मोटर स्किल’ व ‘ ग्राॅस मोटर स्किल’ सबळ करण्याकरिता देखील उपयुक्त खेळ उपलब्ध करण्यात आले आहेत.