सावंतवाडी ता.२८: शहरातील माठेवाडा सुधाताई वामनराव कामत जि प शाळा नंबर ४ मधील अंगणवाडी क्रमांक ६६ च्या वतीने पोषण आहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ नेेेेहा सामंत,द्वितीय क्रमांक सौ स्नेहल पटेल,तृतीय क्रमांक व स्नेहल मसुरकर यांनी पटकावला.
या स्पर्धेमध्ये महिला पालक सौ सुप्रिया केसरकर,मनस्वी शिरोडकर,नूतन सावंत,शकिला शेख वर्षा केनवडेकर साक्षी कर्पे,क्षमा धुरी,करुणा ठाकूर,सिद्धी नार्वेकर,नलिनी कार्वेकर ,प्रांजल मेस्त्री, शकीलाबी बडगी, पूजा भिसे ,यामिनी मडगावकर ,पूजा केरकर यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या रत्नागिरी येथील मुख्य सेविका प्रज्ञा खांडेकर यांच्या हस्ते झाले यावेळी उपशिक्षिका चैताली गवस शिक्षक राजेश जाधव महेश लंबे भक्ती फाले अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी लागणारी मदत या भागातील नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केली पोषण आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा तळलेले पदार्थ वर्ज्य करावेत याबाबतचे मार्गदर्शन मुख्य सेविका सौ खांडेकर यांनी यावेळी केले यावेळी उकडलेले पदार्थांसह विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्य असलेले पदार्थ या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले होते