बांदा ता.२८:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आज संचलन केले. त्यानंतर आळवाडी येथील मैदानात ‘मॉक ड्रिल’ करण्यात आले.
शहरात बंदोबस्त व निवडणूक कालावधीत आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिस कर्मचारी यांनी सेवा कशी करावी, याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते.
संपूर्ण शहरात व बाजारपेठेत संचलन करण्यात आले. आळवाडी येथे ‘मॉक ड्रिल’ करण्यात आले. यामध्ये आपत्कालीन स्थितीत पोलिस यंत्रणेने कोणती भूमिका घ्यावी याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये २ अधिकारी व ४४ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांद्यात पोलिसांचे संचलन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES