Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोंकण पर्यटनवेंगुर्लेत घराला आग ;सुमारे साडे चार लाखांचे नुकसान..

वेंगुर्लेत घराला आग ;सुमारे साडे चार लाखांचे नुकसान..

मासेमारीची जाळी जळून खाक : सुदैवाने मोठा अनर्थ टळला…

वेंगुर्ले ता.१०: येथील उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगितले जात आहे.
गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांचे भरवस्तीत घर आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्या च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. त्यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा नारायण तोरस्कर हा त्या वेळी समुद्र किनारी मासेमारी नौका आल्याने काम करत होता. त्याला घराला आग लागल्याचे समजताच तो धावत घरी गेला. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आगीने रौद्ररूप घेतल्याने वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलावला आणि आग आटोक्यात आणण्यात आले. अग्निशमन बंबावरी सागर चौधरी, फायरमन नरेश परब, भाऊ कुबल, पंकज पाटणकर, देवेंद्र जाधव, अजय जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत घर तसेच घरातील टीव्ही, डिस्को जिलेटीन मासेमारी नायलॉन जाळी, लाईट जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments