विनायक राऊत; राजन तेलींना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या…
वेंगुर्ले,ता.१०: विधानसभा मतदारसंघात यावेळी पोपटपंची, थापेबाजी करणारे उमेदवार आहेत. सर्वसामान्य जनतेचे काही देणेघेणे नसलेल्या व प्रत्येकवेळी पक्षप्रवेश करून आपला स्वार्थ साधणाऱ्या दीपक केसरकर यांना या निवडणुकीत घरी बसवा. त्यासाठी मशाल चिन्हला व राजन तेली यांना आपल्या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, असे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले.
सावंतवाडी मतदारसंघाचे
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या तुळस येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी , उपजिल्हाप्रमख प्रकाश गडेकर ,तालुकाप्रमुख यशवंत परब , शहरप्रमुख अजित राऊळ , जिल्हा संघतिका श्रेया परब , विधानसभा संघतीका सुकन्या नरसुले , संपर्कप्रमुख भालचंद्र चीपकर , माजी नगराध्यक्ष संदेश निकम, अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुख रफिक बेग , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय , माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी उपसभापती प्रफुल्ल परब , युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, सावंतवाडी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, ठाकरे शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत , विभागप्रमुख संदीप पेडणेकर , सुभाष परब , ठाकरे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.राऊत म्हणाले, महविकस आघाडीची सत्ता आल्यास पुढील ५ वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहे, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महिलांना महालक्ष्मी योजना आणून महिना ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना महिना ६ हजार रुपये व मुला मुलींचे पदवीपर्यंत चे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे,असेही जाहीर केले आहे.त्यामुळे या निवणुकीत् राजन तेली यांना मतदान करून हक्काचा आमदार म्हणून निवडून आणा , असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान खासदारकित पराभूत झालो असलो तरी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रियाशील राहणार असे म्हणाले. दरम्यान चिपी ते मुंबई विमानसेवा बंद होऊ देणार नाही , त्यासाठी प्रयत्नशील राहणार, असेही ते म्हणाले.
राजन तेली म्हणाले ,आज रोजगार , बेरोजगारी , आरोग्य हे प्रश्न केसरकर यांच्या गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत अधिक बिकटच झाले आहेत.त्यामुळे विकास खुंटला आहे.तालुक्यातील उषा इस्पात कंपनी , उत्तम स्टील ,एअरपोर्ट यांची काय स्थिती आहे.एअरपोर्ट वर चांगल्या पद्धतीने लक्ष दिला असता तर पर्यटन दृष्टीने विकास झाला असता.खऱ्या अर्थाने विकास , रोजगार , आरोग्य , शेतकरी प्रश्न ,जंगली जनावरांचे प्रश्न ,पीक विमा प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी रहा. मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब करून आपल्याला तुमची सेवा करण्याची संधी द्या, असे तेली म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी संघटनेचा राजन तेली यांना पाठिंबा राहील, असे जाहीर केले. यावेळी विविध पदाधिकारी नियुक्ती देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले.