स्वप्निल लातयेंचा सवाल; आता जनता तुम्हाला घरी बसवणार हे निश्चित…
सावंतवाडी,ता.११: गेले पंधरा वर्षे आमदार असलेले दीपक केसरकर साधे हॉस्पिटल सुधारू शकत नाहीत तर मतदार संघाचा विकास काय करणार? तसेच मंत्री असून दिव्यांग बांधवांसाठी काय केलात? कोणती सेवा दिली? असा सवाल स्वराज्य दिव्यांग संघटना अध्यक्ष स्वप्निल लातये यांनी केला आहे. दरम्यान या निवडनुकीत जनता पंधरा वर्षाचा रोष बाहेर काढणार आहे. त्यामुळे आता जनता तुम्हाला घरी बसवणार हे निश्चित आहे, असाही टोला त्यांनी लगावला. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, तुम्ही जे मतामाठी भावनिक राजकारण करता याला दिव्यांग बांधव कधीच बळीपडणार नाही. पंधरा वर्षात हॉस्पिटल सुधारू शकत नसाल तर तुम्ही मतदार संघाचा विकास काय करणार? मतदार संघात रोजगार आणणार होतात त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित करत जनता तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आहे. या निवडणुकीत जनता पंधरा वर्षाचा रोष बाहेर काढणार आहे. तुमच्या घरच्या समोर असलेल बस स्टँडची अवस्था काय करून ठेवली आहे. त्यामुळे आता जनता तुम्हाला घरी बसवणार आहे. हे निश्चित आहे, असे ही ते म्हणाले.