Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापरिस्थिती बदलायची असेल तर हीच ती संधी...

परिस्थिती बदलायची असेल तर हीच ती संधी…

राजन तेली; पंधरा वर्षांत मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच…

 

सावंतवाडी,ता.११: गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर हीच ती संधी आहे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले.

सावंतवाडीत प्रचारानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा शैलेश गवंडळकर, महेंद्र सांगेलकर काशिनाथ दुभाषी, उमेश कोरगावकर, श्रुतिका दळवी, सायली दुभाषी, आशिष सुभेदार, निशांत तोरस्कर, नाना मसुरकर, बाळ चोडणकर आदी उपस्थित होते.

श्री.तेली पुढे म्हणाले, या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. ठाकरे शिवसेनेची गद्दारी करून ५० खोके घेतलेले केसरकर या ठिकाणी मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र केसरकारांविषयी मतदार संघात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून आपला स्वार्थ साधला आहे. त्यामुळे मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे. केसरकर आणि विकास केला तर विकासाच्या मुद्द्यावर ते का बोलत नाहीत? गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकही आमसभा ते घेऊ शकलेले नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय आमदाराला मुंबईला पाठवून द्या, असे ही ते म्हणाले.

श्री. साळगावकर म्हणाले, विधानसभा निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे. भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी काम करून ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांना विधानसभेत पाठविण्यासाठी कामाला लागा. त्यासाठी तुम्हाला लागेल ते सहकार्य आम्ही करू, अशी ग्वाही दिली तर या ठिकाणची जनता केसरकर यांच्या कार्यालयात कामानिमित्त गेल्यास केसरकर भेटतात का?मतदार संघातील दहा तरी युवक युवतींना त्यांनी रोजगार दिला का? मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे काय झाले? असे अनेक प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित करत केसकरांवर टीका केली. स्थानिक आमदाराने मतदार संघातील जनतेला वेळ दिला पाहिजे लोकांशी कनेक्ट राहणे गरजेचे असते. त्यामुळे तेलींसारख्या लोकांशी बांधील असलेल्या उमेदवाराच्या तुम्ही पाठीशी राहा येणाऱ्या काळात नक्कीच मतदार संघात विकास झालेला दिसेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments