अर्चना घारे; पर्यटन विकासाच्या वल्गना न करता कृतीतून उत्तर देऊ…
सावंतवाडी, ता.११: दीपक केसरकर हे पक्ष बदलू आमदार आहे. त्यांनी केवळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी केले आहे. दरम्यान सत्तेचे अधिकार व जबाबदारीचे पद असताना सुद्धा केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे सावंतवाडी मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे आता ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या वल्गना न करता कृतीतून उत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.