Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार....

दीपक केसरकर राज्यात १ नंबरचे मताधिक्य मिळविणार….

अशोक दळवी; राजन तेली जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार…

 

सावंतवाडी,ता.११: ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट जनसेवक अशी होत आहे. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. केसरकर यांनी राज्यात लक्षवेधी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे असे कार्यसम्राट शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य मिळवून विजयी होतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला. दरम्यान सलग दोन वेळा पराभव जनतेने नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. पावसाळ्यात जशी अळंबी येतात, तशी निवडणूक आली की अशा प्रवृत्ती डोके वर काढत असतात त्यामुळे अशा प्रवृत्तीला जनता मतपेटीतून उत्तर देईल, असे ही ते म्हणाले.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, दीपक केसरकारांनी पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत करोडो रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीचा निधी आणला. त्यांच्या कार्याचा राज्यभर दबदबा आहे. राज्यातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग घेतला जातो. हे आपल्या मतदारसंघाचे भाग्य आहे. त्यांना राज्यभर मिळणारा मान व त्यांच्या कर्तृत्वाचा काही जणांना पोटशुळ उठल आहे. आपल्या प्रेमळ व विनम्र व्यक्तिमत्त्वामुळे केसरकर जनतेच्या मनातील आमदार मंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळात त्यांनी शिवसेनेची प्रभावी बाजू मांडली हे संपूर्ण देशाने पाहिले. त्यांचे सर्व भाषा वरील प्रभुत्व सर्वांनी पाहिले. कुठचाही आरोप प्रत्यारोप यामध्ये न अडकता शांतपणे जनतेचा विकास या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन केसरकर सतत कार्यरत असतात. अशा या कार्यसम्राट जनसेवकाला महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य देऊन इतिहास घडवूया, असे आवाहनही श्री. दळवी यांनी केले.

दरम्यान काही माणसे पैशाने मतदारांना विकत घेण्याची स्वप्न रंगवत आहेत. त्यांची ही स्वप्नच राहतील. तुमचा या मतदारसंघाशी काय संबंध? तुम्ही पैसा कसा कमावला? जनतेसाठी काय केलात? हे सर्व जनतेला माहित आहे. पावसाळ्यात जशी अळंबी येतात, तशी निवडणूक आली की अशा प्रवृत्ती डोके वर काढत असतात त्यामुळे अशा प्रवृत्तीला जनता मतपेटीतून उत्तर देईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments