संदेश पारकर ३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार?

190
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२९ : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रबळ दावेदार असलेले युवा नेते संदेश पारकर हे गुरुवारी ३ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. श्री. पारकर यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र पुढील दोन दिवसात नारायण राणे यांचा भाजप प्रवेश झाला आणि कणकवलीसाठी विद्यमान आमदार नितेश राणे यांना भाजप कडून तिकीट निश्चित झाले तर श्री.पारकर हे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांकडून आज व्यक्त करण्यात आली.
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप कडून निवडणूक लढविण्यासाठी संदेश पारकर यांनी गेले वर्षभर तयारी सुरू केली आहे. श्री पारकर यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनीही माघार घेतल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपकडून श्री पारकर हेच उमेदवार असतील असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि आमदार नितेश राणे हेच कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्यामुळे कणकवलीचे तिकीट राणेँना मिळणार की पारकर यांना याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याअनुषंगाने संदेश पारकर प्रेमींनी आज कणकवलीत बैठक घेतली. यात काहीही झाले तरी श्री पारकर यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरण्यात आला. राणे यांना भाजपत घेण्याबाबत भाजप पक्षातच मतभेद आहेत तर भाजप कडून संदेश पारकर हवेत असाही आग्रह अनेक कार्यकर्त्यांनी धरला आहे या पार्श्वभूमीवर श्री पारकर हे ३ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान २ ऑक्टोबरला राणा यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कणकवली विधानसभेत उमेदवारी पारकरांना मिळणार की राणे यांना याबाबत जिल्हावासीयांना मध्ये औसुक्य आहे. तसेच राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर पारकर हे अपक्ष लढत देण्याची शक्यता आहे अशीही माहिती पारकर समर्थकांकडून देण्यात आली.

कणकवली ता. २९ :

\