चिंदरमध्ये स्वाभिमानला खिंडार…

110
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकरवाडीतील कार्यकर्त्यांचा आम. नाईकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

मालवण, ता. २९ : जिल्ह्यात सध्या स्वाभिमान पक्ष नेतृत्वाला कंटाळून स्वाभीमानचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मालवण तालुक्यातील चिंदर पालकरवाडी येथील स्वाभीमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत आज कणकवली विजयभवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून सर्वांचे स्वागत केले. येत्या विधानसभा निवडणूकीत जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली आहे.
यावेळी भास्कर पालकर, वेदांत गोलतकर, भालचंद्र गोलतकर, लोकेश गोलतकर, नयन माधव, प्रकाश लब्दे, गोपाळ पालकर, गणेश पालकर, सदानंद पालकर, भिरोजी पालकर, श्रद्धा म्हापसेकर, समीक्षा पाताडे, नम्रता पालकर, गौरी पाटणकर, अंजनी पालकर, समीक्षा पाटणकर, गजानन पाटणकर, शिशिर पालकर, शेखर पालकर, रवींद्र पालकर, योगेश चव्हाण, मनिष सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
आमदार नाईक यांनी विविध विकासकामांतून आपली एक वेगळी छाप समाजमनावर उमटवली आहे. कुडाळ मालवण तालुक्यातील असंख्य विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. चिंदर गावातही त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. गावचा सर्वांगिण विकास आमदार वैभव नाईकच करू शकतात याच भावनेतून त्यांना साथ देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाऊ परब, समीर हडकर, अनिल गावकर, समीर लब्दे, संजय हडपी, संजय माळकर, प्रकाश पराडकर, मिलिंद चिंदरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

\