सावंतवाडी,ता.१४: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ ‘बालदिन’ हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसमवेत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रशालेतील संगीत शिक्षक शकपिल कांबळे यांनी या दिवशी चाचा नेहरू यांच्यासारखा वेश परिधान केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनीही यादिवशी छान रंगीबेरंगी वेश परिधान केले होते. त्याचप्रमाणे, इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांच्या इंटरहाऊस काॅम्पेटिशनस घेण्यात आल्या. यामध्ये , इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांची ‘स्पेल बी ‘ ही स्पर्धा घेण्यात आली, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची ज्ञानेन्द्रियांद्वारे वस्तूंची ओळख, इयत्ता पाचवीची गणित प्रश्नमंजुषा तर इयत्ता सहवीच्या विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शालेय समन्वयक सौ. सुषमा पालव, शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.