Monday, November 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामनविसेच्या गणेश सजावट स्पर्धेचा वर्धन आजगावकर मानकरी..

मनविसेच्या गणेश सजावट स्पर्धेचा वर्धन आजगावकर मानकरी..

आचारसंहितेनंतर बक्षीस वितरण, अशिष सुभेदार यांची माहिती

सावंतवाडी ता.२९:

येथील मनविसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहर मर्यादित “इको-फ्रेंडली” गणेश सजावट स्पर्धेत वर्धन आजगावकर-माठेवाडा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.द्वितीय भूमी पटेकर-सालईवाडा,तृतीय अखिलेश कानसे-माठेवाडा तर उत्तेजनार्थ नंदन उपेरकर-माजगाव आणि अंतरा सुभेदार-खासकिलवाडा यांना प्राप्त झाला आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण आचारसहिते नंतर करण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.
या स्पर्धेत एकूण तेरा स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.दरम्याने याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित राहणार आहेत.यावेळी सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम,प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार प्रणव कासकर आणि साईश वाडकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments