वेंगुर्ले ता.२९:
तालुक्यातील शिरोडा-केरवाडा येथे श्री देवी माऊली देवस्थान मंडळाच्या वतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत खुल्या दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा येथील माऊली मंदिर परिसरात घेण्यात येणार आहे.या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या २० संघांना सहभाग दिला जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी प्रथम क्रमांक साठी दहा हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये,तृतीय क्रमांकासाठी चार हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तरी इच्छुक संघानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा,असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कुंदन बांदेकर-८६९८४५५५०७, योगेश मोर्जे-९७६४०११८१४, स्वप्निल कोळंबकर -९४०३२९८९०६,निखिल नाईक-८३०८४९४०१२ या नंबर वर संपर्क साधावा.