नावे जाहीर: कणकवली मतदारसंघ मात्र भाजपला सोडल्याची चर्चा..?
कुडाळ,ता.२९:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आले. यात विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह वैभव नाईक यांचा समावेश आहे.
तर रत्नागिरीत उदय सामंत, गुहागरमध्ये भास्कर जाधव, दापोली मध्ये योगेश कदम, चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवारी मिळालेले आमदार वैभव नाईक यांनी दुजोरा दिला आहे. आम्हाला आज याबाबत माहिती देण्यात आली व एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. असे नाईक म्हणाले.
या सर्व धामधुमीत कणकवली मतदारसंघ भाजपला सोडल्यात जमा आहे.अद्यापपर्यंत युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तूर्तास तरी त्याठिकाणी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दिपक केसरकर तर कुडाळ मधून वैभव नाईक यांना पुन्हा संधी मिळाली आहे