महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब गोसावी यांची फेरनिवड…

112
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब गोसावी यांची फेरनिवड…

मालवण, ता. ३० : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र, समाजसेवक शांताराम ऊर्फ बाळा गोसावी यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या दादर- मुंबई येथे सन २०१९ ते २०२३ या कालावधीच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी झालेल्या सभेमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी जितेंद्र शाह, कार्याध्यक्षपदी भारत देसडला, उपाध्यक्षपदी अरुण केदार, धनंजय साठे, गिरीश तुळपुळे, प्रदीप भाटकर, शांताराम गोसावी, मानद सचिव यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, मानद सहसचिव अभिजित मोहिते, अशोक कचरे, दत्तप्रसाद शेमबेकर, संतोष चव्हाण, योगेश फणसळकर यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकनाथ सावंत यांनी काम पाहिले.
मसुरे येथील कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या श्री. गोसावी यांनी ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनेक भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. क्रीडा क्षेत्रासह आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या बाळा गोसावी यांच्या निवडीबद्दल मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.
बाळा गोसावी म्हणाले, राज्यात आणि देशात कॅरम खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपला सदैव प्रयत्नशील राहू. राज्यातील होतकरू कॅरम खेळाडूंना कॅरम क्षेत्रात पुढे आणण्यासाठी आपल्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल बाळासाहेब गोसावी यांचे मसुरे मर्डे सरपंच संदीप हडकर, जि. प. सदस्य सरोज परब, प. स. सदस्य गायत्री ठाकूर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उद्योजक दीपक परब, दीपक सावंत, महेश बागवे, छोटू ठाकूर, विलास मेस्त्री, शिवाजी परब, उपसरपंच पिंट्या गावकर यांनी अभिनंदन केले आहे.

\