सिग्मातर्फे मोफत सैन्य भरती मेळावा आयोजन…

103
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता:३० नोव्हेंबर २०१९ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासाठी नियोजित असलेल्या आर्मी भरतीच्या धर्तीवर सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग वर्दे याठिकाणी मोफत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. करण्यात आले आहे.
संरक्षण क्षेत्रात निघणाऱ्या भरत्या व या भरत्यांमध्ये आपल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी देखील उज्ज्वल यश संपादन करावे यासाठी सिग्मा अकॅडेमितर्फे विविध उपक्रमांचे मोफत आयोजन करण्यात येते. सध्या नोव्हेंबर २०१९ रत्नागिरी मध्ये होणाऱ्या सैन्य भरतीसाठी उमेदवारांनी संपूर्ण तयारीनिशी उतरावे यासाठी या मेळाव्यांतर्गत उपस्थित उमेदवारांची लेखी मैदानी व मेडिकल चाचणी घेऊन मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून उमेदवारांना आपण भरतीसाठी सज्ज आहोत हे समजेल.
मेळाव्यामध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांकडून घेऊन प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यासोबतच मैदानी तयारीसाठी आर्मी मॅन कीर्तिराज तर्फे व त्यांची टीम जे सध्या इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत ते आर्मी भरतीसाठी आवश्यक असणारी कौशल्य याबाबत मार्गदर्शन करणार असून त्यासोबत उमेदवारांचे मेडिकल देखील डॉक्टर कडून तपासणी करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एनसीसी कमांडिंग आॅफिसर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सर्वरूप संधीचा फायदा आर्मी मध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी घ्यावा व स्वतःला आजमावून पाहावे.
सदर मेळावा हा सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग वर्दे या ठिकाणी ६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. या सर्व संधीचा फायदा उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन सिग्माच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.

\