कुडाळात तिघा हाॅटेल व्यावसायिकांवर कारवाई

104
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आचारसंहितेचा दणका; आदेशाचा उल्लंघन केल्याचा ठपका

कुडाळ;दि:३०-
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना रात्री १० नंतर हॉटेल किंवा अन्य दुकाने सुरू ठेवू नयेत असे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ तीन हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र याबाबत यांनी अधिक माहिती दिली नसून सदरची कारवाई ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी करीत असल्याचे सांगितले.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर अनेक कायदे केले जातात. या कायद्यांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. आचारसंहितेच्या कायद्याचे कडक पालन प्रशासन करते आचारसंहितेच्या काळात रात्री १० नंतर दुकाने हॉटेल्स हे बंद करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाने दिलेले आहेत. अशातच कुडाळच्या तीन हॉटेल व्यावसायिकांनी त्यांची हॉटेल १० वा. नंतर सुरू ठेवल्याचे कुडाळच्या गस्ती पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांच्यावर हा कारवाई बडगा कुडाळ पोलिसांनी उगारला असून याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांनी दिले.

\