दीपक केसरकरांकडुन “कॅम्पेनिंग” : भगवा तर फडकणारच असा दावा…
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,३०:
विद्यमान शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना तिकीट जाहीर होता न होता तोच त्यांनी अनोख्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीसाठी आपले “कॅम्पेनिंग” सुरू केले आहे. त्यांच्या विरोधात राहणारे भाजपाचे उमेदवार यांनी “आमचं ठरलंय” असं वाक्य वापरून आपले “कॅम्पेनिंग”केले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून “सावंतवाडी फक्त साहेबांचा… फक्त शिवसेना… भगवा तर फडकणारच अशा आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दीपक केसरकर यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे यापूर्वी ते शिवसेनेतून आणि तत्पूर्वी राष्ट्रवादीचे सावंतवाडी मतदार संघाचे आमदार झालेल्या केसरकरांना शिवसेनेने पालकमंत्री,अर्थ,गृह राज्यमंत्री अशी अनेक पदे दीली. आता मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद निश्चीतच मिळेल असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात सद्यस्थितीत भाजपाचे उमेदवार राजन तेली व राष्ट्रवादीतून केसरकर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नगराध्यक्ष बबन साळगावकर उभे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आपली बाजू मांडण्यासाठी केसरकरांनी सावंतवाडी फक्त साहेबांचा… फक्त शिवसेनेचा… असा संदेश देणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत.