हिर्लोक पंचक्रोशीचा पाठींबा:प्रवेशाच्या पाश्वभूमीवरील बैठकीत निर्णय
माणगाव/मिलिंद धुरी.ता,३०: नारायण राणे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असा निर्णय काल रात्री कुडाळ येथील गावात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांकडून घेण्यात आला
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बैठक: काल हिर्लोक येथील जिल्हा उपाध्यक्ष दीपक नारकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.यावेळी कुसगाव,गिरगाव,नारूर, निवजे,किंनळोस , आदी पंचक्रोशीमधील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असे ह्या बैठकीमध्ये सुर उमठले यावेळी उपस्थित त्यावेळी उपस्थित स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष दीपक नारकर, हिर्लोक माजी सरपंच उदय सावंत, कुसगाव माजी सरपंच अरुण आचरेकर, किनळोस माजी सरपंच प्रकाश, प्रशांत बोर्डेकर उपसरपंच नारूर, किरण कदम, विजय मिस्त्री, बाबू सरनोबत, दत्ता सरनोबत, प्रशांत सरनोबत, असे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.