कल्पना मलये द्वितीय तर वर्षाराणी प्रभू तृतीय : विजेत्यांचा नगरवाचनालयात गौरव…
कणकवली, ता.२६ : तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कल्पना मलये तर तृतीय क्रमांक वर्षाराणी प्रभू यांना देण्यात आला. कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने तालुकास्तरीय वाचक स्पर्धेची तालुकास्तरीय फेरी कणकवी नगरवाचनालयात झाली. या स्पर्धेसाठी साहित्यिक जयवंत दळवी यांची कोणताही साहित्यकृती या विषयावर विवेचन करावयाचे होते. यात जयवंत दळवी यांच्या अधांतरी या कादंबरीवरील विवेचन हेमंत पाटकर यांनी सादर केले. या सादरीकरणाला प्रथम क्रमांक देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती कल्पना मलये यांना महानंदा या कादंबरीच्या विवेचनासाठी मिळाले. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती वर्षाराणी प्रभू यांना जयवंत दळवी यांच्या लोक आणि लौकिक या पुस्तकाच्या विवेचनाला मिळाले.
स्पर्धेतील इतर स्पर्धकांपैकी विजय कुमार शिंदे यानी ‘अधांतरी’, देवीका मोरये हिने ‘बाजार’ या साहित्यावर आपली विवेचने सादर केली. स्पर्धेचे परीक्षण म्हणून किशोर कदम, रमा भोसले यांनी केले. पारितोषिक विजेता तिन्ही स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. यावेळी नगर वाचनालयाचे सहकार्यवाह डी पी तानवडे, पी जे कांबळे, किशोर कदम, रमा भोसले यांनी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी.पी. तानवडे यांनी केले.