पणजी ता.३०:आपल्या सहकाऱ्यांसह इंडिगोच्या विमान दिल्ली येथे निघालेल्या विजमंत्री निलेश कब्राल यांच्या विमानाच्या डाव्या इंजिनने अचानक हवेतच पेट घेतल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.हा अपघात काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.या सर्व प्रकाराने एकच खळबळ उडाली होती.मात्र सुदैवाने यात मोठा अनर्थ टळला.
रविवारी रात्री इंडिगोच्या 6E336 या विमानाने वीजमंत्री श्री.कब्राल हे एका बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते.विमानाने उड्डाण केल्या नंतर काही वेळाने डाव्या बाजूच्या इंजिनाने पेट घेतला.इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच पायलटने डाव्या बाजूचे इंजिन बंद करून विमान पुन्हा दाबोळी विमानतळाच्या दिशेने वळवून रात्री ११:३०च्या सुमारास विमानाचे इमर्जन्सी लँडींग केले.विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवासी सुखरूप आहेत.
गोवा वीजमंत्री निलेश कब्राल विमान अपघातात सुदैवाने बचावले…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES