Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिमखाना मैदानाची सुधारणा करून क्रिकेट खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या...

जिमखाना मैदानाची सुधारणा करून क्रिकेट खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या…

परिमल नाईक; अन्यथा नगरपरिषदेवर क्रिकेटप्रेमी व युवा खेळाडूंना घेऊन मोर्चा काढू…

सावंतवाडी,ता.२९: येथील जिमखाना मैदानाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्याची तात्काळ सुधारणा करून क्रिकेट खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा सावंतवाडीतील सर्व क्रिकेटप्रेमी व युवा खेळाडूंना घेऊन नगर परिषदेवर मोर्चा काढू, असा इशारा माजी नगरसेवक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, शहरातील जिमखाना मैदान हे ऐतिहासिक मैदान असून या मैदानाने असंख्य क्रिकेट पटू घडवले. जगप्रसिद्ध व क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर सह विनोद कांबळी, प्रवीण आमरे,समीर दिघे आदीं सारखे नामांकित खेळाडूंनी या मैदानावर कै. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले. भारताच्या टीममधील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेले. सावंतवाडी व परिसरातील अनेक टॅलेंटेड क्रिकेट पटू या मैदानावर सरावासाठी इच्छुक असुन ते प्रतीक्षेत आहेत. सरावासाठी व मॅचेस साठी इतर मैदान उपलब्ध सुद्धा नाही. डिसेंबर महिना समीप आला तरी मैदानाची परिस्थिती अतिशय गंभीर असुन वेळोवेळी विनंती वजा मागणी करून सुद्धा परिस्थिती “जैसे थे ”आहे. प्रशासनाची अनास्था, बेजबाबदार पणा व असंवेदनशीलता या बाबी अतिशय चिंताजनक आहेत, अशी टीका माजी नगरसेवक परिमल नाईक यांनी केली आहे. दरम्यान मैदानावर देखभाली करिता लाखो रुपये खर्च केले जातात व त्या खर्चाचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रित्या सहजासहजी अपव्यय होत असुन जनतेच्या पैशाची पायमल्ली करण्यासारखा हा प्रकार आहे. नगरपरिषद प्रशासन खाजगी कार्यक्रमांना जिमखाना मैदान भाडयाने देऊन सुद्धा सदर मैदानाची अवस्था दयनीय करत असते. प्रशासनाने भविष्यात खाजगी प्रयोजनासाठी मैदान भाड्याने देऊन दुरावस्था केल्यास व येत्या पंधरा दिवसात जिमखाना मैदान सुस्थितीत उपलब्ध करून न दिल्यास शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी व युवावर्ग यांच्या समवेत नगरपरिषदेवर नागरी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्री. नाईक यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments