तीस लाखांची बक्षिसे; एम.के.सी.एल आणि सिंधू संकल्पचा पुढाकार…
कुडाळ,ता.२९: येथील एमकेसीएल सिंधुदुर्ग संस्था आणि सिंधू संकल्प ॲकदमी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू आयटी जीनियस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत तब्बल तीस लाखांची बक्षीसे देण्यात येणार आहे.
यात लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल आदींचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत एमकेसीएलचे जिल्हा समन्वय प्रणय तेली यांनी दिली. दरम्यान ” शिकता शिकता ज्ञान मिळवा आणि बक्षीस कमवा” अशी संकल्पना घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अकरावी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अश्या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.