Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर...

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर…

सचिवपदी बाळ खडपकर; नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड…

 

सिंधुदुर्गनगरी,ता.२९: जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर सचिव पदी बाळ खडपकर, परिषद प्रतिनिधी म्हणून गेणेश जेठे यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात संपन्न झाली. या सभेत नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. यात नवनियुक्त कार्यकारिणीत उपाध्यक्ष आनंद लोके, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, संतोष राऊळ, किशोर जैतापकर, खजिनदार संतोष सावंत,महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून) सहसचिव प्रवीण मांजरेकर, कार्यकारणी सदस्य राजन नाईक, लवू म्हाडेश्वर, लक्ष्मीकांत भावे, अमित खोत, प्रशांत वाडेकर, महेंद्र मातोंडकर, सुहास देसाई आणि निमंत्रित सदस्य देवयानी वरसकर आदींची निवड करण्यात आली.

यावेळी अजित सावंत, भगवान लोके, प्रकाश काळे, महेश सरनाईक, रमेश जोगळे, नंदकिशोर महाजन, हेमंत कुलकर्णी, संतोष वायंगणकर, गजानन नाईक, संतोष कुलकर्णी, माधव कदम, राजू तावडे, अयोध्या प्रसाद गावकर, अण्णा केसरकर, संदीप देसाई, राजू मुंबरकर, काका करंबेळकर, लवू खरवत ,एकनाथ पवार, हरिश्चंद्र पवार, दाजी नाईक, मंगल कामत, विजय देसाई, संदीप गावडे, प्रमोद ठाकूर, रवी गावडे, संतोष गावडे, प्रमोद म्हाडगुत आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला पत्रकार तसेच पत्रकारांच्या दिवंगत नातेवाइकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तर समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या सभेत वार्षिक जमा खर्च तसेच इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments