लाखोंचे नुकसान; १५ जणांच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
देवगड, ता.२९: जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या साह्याने कंपाउंड आणि शेतघर तोडून शेतातील आंबा कलमे जाळून टाकल्याचा प्रकार मिठबाव येथे घडला आहे. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजता गोरक्ष गणपती मंदिर नजीक घडली. याबाबतची तक्रार परशुराम पांडुरंग लोके ( वय ६६ ) यांनी दिली आहे.
त्यानुसार १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात अनिल पांडूरंग लोके, चंद्रकांत नाना लोके, अनिकेत विजय लोके, दिप्ती प्रदीप लोके, हेमचंद्र प्रकाश लोके, परेश गजानन लोके, जयेश शैलेंद्र लोके, महादेव एकनाथ लोके, वासूदेव देवू लोके, अशोक गंगाराम लोके, सत्यविजय गंगाराम लोके, विलास महादेव लोके, पुनम हेमचंद्र लोके, अनंत बाजीराव लोके व सचिन गावकर(रा.नारींग्रे) अशी त्यांची नावे आहेत या पंधराजणांनी संगनमत करून अनधिकृतपणे प्रवेश करून जेसीबी नेवून त्याच्या सहाय्याने कंपाऊंड व शेतघर तोडून, पाडून व लागवड केलेली ५० हापूस आंब्याची कलमे जाळून उपटून टाकली असे म्हटले आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी पंधराजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास महिला हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.