देवगड,ता.२९: येथील दाभोळे तिठा परिसरात असलेल्या पिकअपशेड मध्ये लॉक करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे. हा प्रकार २६ तारखेला घडला. याबाबतची तक्रार दुचाकी मालक उमेश कोयंडे यांनी आज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मुंबईला जात होते.
यावेळी त्यांनी आपली गाडी त्या ठिकाणी असलेल्या पिकअप शेडमध्ये लॉक करून ठेवली होती. मात्र आज ते तिथून परतले असता त्यांची गाडी चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.