पक्षप्रमुख ठाकरेंकडून एबी फॉर्म ; ३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार…
मालवण, ता. ३० : शिवसेनेच्यावतीने कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म श्री. नाईक यांना दिला.
शिवसेनेच्यावतीने काल पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सकाळीच आम. नाईक हे मुंबईस रवाना झाले होते. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आम. नाईक यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.
काल सकाळीच त्यांना पक्ष कार्यालयातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अधिकृत प्रचाराचा शुभारंभ साळेल या गावातून केला. येत्या ३ ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.