Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याप्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिमखाना मैदानची दुरावस्था, ८ दिवसात डागडुजी करा...

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिमखाना मैदानची दुरावस्था, ८ दिवसात डागडुजी करा…

अनिल केसरकर; अन्यथा पालिका मुख्याधिकाऱ्यांना मनसे तर्फे घेराव घालण्याचा इशारा…

सावंतवाडी,ता.३०: शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाची सध्या दुरावस्था झाली असून येत्या आठ दिवसात हे मैदान पुन्हा खेळण्यासाठी योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे. गेल्यावर्षी हे मैदान एका खाजगी कार्यक्रमासाठी देण्यात आले होते. त्यामुळे मैदानावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. शहरातील क्रीडाप्रेमींनी यावेळी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने डागडुजी करून हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र त्यावेळी मुख्याधिकारी यांनी मुख्य खेळपट्टीची नव्याने माती टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडाप्रेमींना दिले होते. मात्र वर्षभरात अशा प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. आता परत मैदानावर मातीचे मोठे ढीग रचण्यात आले असून पुढील काम थांबलेलं आहे. त्यामुळे या मैदानावर सरावासाठी येणारे खेळाडू ,सामने आयोजीत करणारे आयोजक यांना त्रास सहन करावा लागत आहे. क्रिडा हंगाम सुरू होऊन देखील नगरपालिका प्रशासन सुशेगात असल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments