वेंगुर्ले,ता.३०: वेताळ प्रतिष्ठान तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी २९ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल , तुळस येथे “जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आहे. ही वक्तृत्व स्पर्धा शालेय मोठा, विशेष व लहान गट अशा एकूण तीन गटात तर पाठांतर स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.
यात २री पर्यंतचा एक गट असून “संस्कृत श्री गणपती स्तोत्र” हा पाठांतर चा विषय आहे तर ३री ते ४थी या गटासाठी “श्री मारुती स्तोत्र” हा पाठांतराचा विषय आहे. तर शालेय गटातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी “महाराष्ट्राची संत परंपरा ” या विषयावर विद्यार्थ्यांनी किमान ५ मिनिटे तर कमाल ६ मिनिटे वेळेत आपले विचार व्यक्त करायचे आहेत. तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ८वी ते १० हा गट असून यासाठी “मराठी भाषा अभिजात – पुढे काय?” हा विषय असून किमान ६ मिनटे तर कमाल ७ मिनिटे इतक्या वेळेत मराठी भाषेतून स्पर्धकांनी विचार मांडायचे आहेत. वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी माध्यमातील इयत्ता १० वी पर्यंतच्या मुलांसाठी “दी ग्रेट लीडर छत्रपती संभाजी महाराज'” हा विषय असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून किमान ६ मिनिटे व कमाल ७ मिनटे वळेत विचार व्यक्त करायचे आहेत. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
तरीही सर्व स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.