देवगड,ता.३०: येथील दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून १५ व १६ जानेवारीला वाडा येथे भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी साडेआठ वाजता येथील दत्त मंगल कार्यालय आयोजित करण्यात आली आहे. श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ मंजिरी दीक्षित यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत- जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये बालगट १ली ते ४थी प्रथम क्रमांक पारितोषिक १ हजार ५०० व्दितीय १ हजार , तृतीय ५०० व उत्तेजनार्थ ४००, कुमार गट ५वी ते १०वी प्रथम क्रमांक २ हजार, व्दितीय १ हजार ५००, तृतीय १ हजार , उत्तेजनार्थ ५००, खुला गट प्रथम क्रमांक ५ हजार, व्दितीय ४ हजार , तृतीय ३ हजार , उत्तेजनार्थ २ हजार व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे बक्षिसाचे स्वरुप आहे.
नियम व अटी नाव नोंदवताना कोणत्या गटासाठी नोंदणी करत आहोत हे त्या मेसेजमध्ये नमुद करणे आवश्यक आहे, गाण्याचे बोल, गाण्याची पटटी नाव नोंदणीच्या मेसेजमध्ये कळविणे अनिवार्य आहे. याकरिता सादरीकरणासाठी ७ मिनिटे इतकी वेळेची मार्यादा असेल. तसेच स्पर्धेला साथसंगतीसाठी हार्मोनियम,तबला आणि साईड रिदम खंजिरी, झांज, चायनीज ब्लॉक, शेकर वादये वापरण्यासाठी परवानगी राहिल.
तसेच इच्छुक स्पर्धकांनी २५ डिसेंबरपर्यंत बालगट नाव नोंदणीसाठी राधिका काणे, कुमार गट नाव नोंदणीसाठी हर्षद जोशी, खुला गट नाव नोंदणीसाठी प्रियांका वेलणकर यांच्याशी संपर्क साधावा.