काही प्रवासी जखमी ;अधिक उपचारासाठी बेळगाव रुग्णालयात हलविले…
दोडामार्ग,ता.३०: चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तिलारी घाटात कर्नाटक येथील मिनी बसचा अपघात झाला. यात बसमधील काही प्रवासी जखमी झाले. सुदैवाने बाजूला उभे असलेल्या अपघातग्रस्त ट्रकला बस धडकल्यामुळे रस्त्यावरच राहिली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती.
ही घटना आज सकाळी येथील जयकर पॉईंट परिसरात घडली. संबंधित बस ही बेळगावहून तिलारी मार्गे गोवा येथे जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या धोकादायक वळणावर गेले अनेक दिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे.