Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeताज्या घडामोडीकणकवलीत २९ डिसेंबरला वारकरी संप्रदायाचा जिल्हा मेळावा...

कणकवलीत २९ डिसेंबरला वारकरी संप्रदायाचा जिल्हा मेळावा…

कणकवली, ता.३० : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या संकुलात होणार आहे. जिल्ह्यातील वारकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी संतसेवा पुरस्काराचे वितरण होणार असल्‍याची माहिती वारकरी संप्रदाय संस्थेचे सचिव राजू राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्‍हा वारकरी संप्रदाय संस्थेची सभा आज जिल्‍हाध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात जिल्‍हा वारकरी मेळाव्याची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, सचिव राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, संचालक विलास राणे, सत्यवान परब, गणपत घाडीगांवकर, प्रकाश सावंत, विनायक मेस्त्री, चंद्रकांत परब, राजेंद्र सरवणकर व वारकरी उपस्थित होते.
जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे दरवर्षी मानाचा संत सेवा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील
६५ वर्षावरील कीर्तनकार, मृदंग मनी यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग, ता कणकवली जिल्हा कार्यालय येथे अर्ज करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments